श्रेयस श्यामकुवर ची आय आय टी मुंबई साठी निवड

0
99

गोंदिया / धनराज भगत

मास्टर्स संयुक्त प्रवेश परीक्षा (Jam) अंतर्गत गणितीय सांख्यिकी(Mathematical Statistics) ह्या विषयाची निकाल सूची २९ मे २०२४ बुधवार रोजी प्रकाशित झाली, असून आमगांव नगरपरिषद अंतर्गत रिसामा येथील विद्यार्थी श्रेयस राजकुमार श्यामकुवर या विद्यार्थ्यांची निवड आय आय टी मुंबई (IIT Bombay) येथे ऑल इंडिया रैंक-३७७ (AIR -377) गणितीय सांख्यिकी (Msc Statistics) साठी निवड झाली आहे. श्रेयस ने मास्टर्स संयुक्त प्रवेश परीक्षा ११ फेब्रूवारी २०२४ रोजी दिली होती. यात यश संपादन केले व आपल्या यशाचे श्रेय आई हितेश्वरी श्यामकुवर, वडील राजेश श्यामकुवर व भाऊ निषद यांना दिले आहे.

याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा आमगाव तर्फे श्रेयश चे पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी भरत वाघमारे, राजेंद्र सांगोळे, विद्या साखरे, शालु कोटांगले आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसितेपार के सुर्यवंशी परिवार को सात्वना भेट
Next articleकर्कापुर येथे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून साजरा केला मुलीचा वाढदिवस