कर्कापुर येथे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

0
45
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसानिमित्त अवाढव्य खर्चही करण्यात येतो. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काहीतरी देणे असते याच भावनेतून तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील ज्ञानेश्वर सिंदपुरे यांनी मुलगी कु. अन्वी हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त 50 वृक्षांचे वृक्षारोपण गावातील स्मशानभूमीत करण्यात आले. सदर वृक्षारोपण सामाजिक वनीकरण विभाग भंडारा, परिक्षेत्र तुमसर व ग्रामपंचायत कर्कापूर यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणात वृक्षांचे महत्त्व व समाजात स्मशानभूमी विषयी असणाऱ्या अशुभ धारणा अंधश्रद्धा खोडून काढणे. असा दुहेरी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी या वृक्षांचे संगोपन व संवर्धन ग्रामपंचायतची असेल अशी ग्वाही सरपंच रवी डहाळे यांनी दिली. याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी धनविजय, वनरक्षक एस. एस. कटरे, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.