गोरेगाव :- मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये मा. एन. जे. शिरसाटे साहेब गटशिक्षणाधिकारी गोरेगाव यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला सत्कारमूर्ती एन जे. शिरसाटे साहेब, संस्था सचिव प्रा. आर. डी. कटरे सर, नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी पारधी साहेब , ही. दा. येळे सर, आर. आर. अगडे सर, शाळेच्या प्राचार्या सौं छाया पी. मेश्राम व सेवानिवृत्त शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्कारमूर्ती शिरसाटे साहेब यांचा मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव च्या वतीने संस्था सचिव प्रा आर. डी. कटरे सर , प्राचार्या सौं छाया पी मेश्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपास्थित सत्कारमूर्ती सिरसाटे साहेबांनी कार्यक्रमच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले.