
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :- 1 जून 2024
देवळी नगरपालिकेच्या स्वच्छ पाणीपुरवठ्याकडे देवळी नगर परिषद चे दुर्लक्ष असून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पिवळसर व सदृश्य नारू सारखे किटाणू नळाच्या पाण्यातून येत असल्याचे आढळून आले आहे. देवळी शहरातील खोपाळपुरा परिसरामध्ये अक्षय ठाकरे वॉर्ड नंबर 17 यांच्या घरी नळाच्या पाण्यामध्ये नारू सदृश्य आढळून आला आहे. त्याचप्रमाणे पाणीसुद्धा दूषित व पिवळसर येत असल्याची तक्रार त्यांनी नगरपालिका कार्यालयात दिलेली आहे. परंतु त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने याची दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.


