आमगांव : इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा इयता दहावी चा ९९ टक्के निकाल लागला आहे, प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या विद्यालयात प्राचार्य प्रतिभा पडोळे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
नुकतेच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षेत इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. इयता दहावीत तनिषा गिरेपुंजे ९१.२९ टक्के गुण मिळवून विद्यालयातुन प्रथम आली आहे. श्रुती राहांगडाले, ९०.२०%,उर्वशी उके ९०टक्के, हिमानी पटले ८७.४०टक्के, आयुषी चुटे ८७.२०टक्के, लक्ष्मी कुकडीबुरे ८६.४०टक्के, नम्रता मानकर ८५.६०टक्के, वैष्णवी वाढई८५.२०टक्के गुण मिळविले असून इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरात दर्जेदार व नावीन्यपूर्ण उपक्रमांनी यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सोमेश्वर पडोळे, संस्थासचिव लिलाधर गिरेपुंजे उपाधयक्ष प्रा, जिवन जीभकाटे, संचालक सुनील पडोळे, प्राचार्य प्रतिभा पडोळे,आर,बी,शेंडे,वी,एस,निखारे,कु,के,जी,दमाहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.