घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद

0
33
1

आरोपींकडुन चोरीस गेलेले सोन्या – चांदीचे दागिने असा किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल केले हस्तगत

गोंदिया / धनराज भगत

 थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी  देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल, रा. आशीर्वाद धर्म काट्याच्या मागे, कुंदन कुटी मंदीर जवळ, मुर्री गोंदिया हे परिवारासह बाहेरगावी शिवणी (मध्य प्रदेश) गेले असता दिनांक 25/05/2024 चे 10.00 वाजता ते दिनांक 26/05/2024 चे 22.00 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे राहते घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिने व नगदी 90 हजार रुपये असा किंमती एकूण 2 लाख 20 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्रं. 343/2024 कलम 454, 457, 380 भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम यांची मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो. नि.  सोमनाथ कदम यांचे नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकण पथकातील अधिकारी-अंमलदार यांनी सदर गुन्हयातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित गुन्हेगार नामे,फरहान ईशाक कुरैशी वय 20 वर्षे, आशिक नरेंद्र बंसोड वय 20 वर्षे, दोन्ही रा. बाजपेयी वार्ड, गौतमनगर, गोंदिया यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांना सखोल विचारपूस चौकशी केली असता दोघांनीही नमूद घरफोडी गुन्हा केल्याची कबुली दिली.
गुन्ह्यातील चोरी केलेला किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल आरोपीतांचे घरझडतीत हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे..आरोपीतांना गुन्ह्यांत अटक करण्यात आली असून आरोपीतांना मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 04/06/2024 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे…. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. सोमनाथ कदम हे करीत आहे.
वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे सदरची उत्कृष्ठ कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, गोंदिया शहर चे पो. नि. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि. सोमनाथ कदम, स.पो.नि.विजय गराड, स.पो.नि. पांढरे, पोउपनि. मंगेश वानखेडे, पोलीस अंमलदार, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हान, रिना चव्हान, अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाणे यांनी केली आहे.