गडचिरोलीत मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

0
100

न्युज प्रभात नेटवर्क 

गडचिरोली, दि. 03

       दिनांक 04 जुन ला रहदारीसाठी बंद राहणारे मार्ग खालील मॅप मधे दिले आहेत. कृपया त्याची नोंद घ्यावी. सोबत विस्तृत माहिती सुद्धा दिली आहे.

      जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने गडचिरोली-चिमुर (12) लोकसभा मतदार संघातील मतमोजनीची प्रक्रिया 04/06/2024 रोजी कृषी महाविदयालय (अँग्री कल्चर कॉलेज) सोनापुर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे पार पडणार आहे‌.

      सदर मतमोजनी चे ठिकाण गडचिरोली-चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे मतमोजनी प्रक्रियेदरम्यान उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते मोठया संख्येने येण्याची शक्यता आहे. मतमोजनी दरम्यान सदर महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

       त्यावर उपाययोजना म्हणुन सदर महामार्गावरील वाहतुक दि. 04/06/2024 चे सकाळी 05.00 ते रात्री 12.00 वाजे पर्यंत बंद करण्यात येत आहेे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी सदर मार्ग बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये.

पर्यायी वाहतुक मार्ग व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.

1) जड वाहने – इंदिरा गांधी चौक – चामोर्शी रोड – सेमाना देवस्थान – आंनदानगर कॉलनी– कोर्ट चौक – चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

2) हलके वाहने – आय.टी.आय चौक – एल.आय.सी. चौक – मा.सी.ई.ओ. बंगला चौक- शासकिय विश्राम गृह (सर्कीट हाउस) –जिल्हा सामाण्य रुग्णालय मार्गे चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

          मतमोजनीसाठी येणा­या उमेदवार व पक्षांचे कार्यकत्यांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय जिल्हा परिषद च्या खुल्या मैदानात केलेली आहे. तरी याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी.

Previous articleघरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद
Next articleवेध निकालाचे : आघाडीचा पंजा, की युतीचे कमळ ❓