आमगाव नगर परिषदेत पाण्यासाठी आता टँकर ने पाणीपुरवठा…

0
5
1

नगरपरिषदेच्या वार्ड नंबर सहा मध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण…
पाणी समस्या पाहून नगरपरिषद प्रशासनाने केला टँकरने पाणीपुरवठा सुरू…
कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी नागरिकांची मागणी…
नगरपरिषद प्रशासनाच्या भूमीके कडे आता सर्वांचे लक्ष…

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया जिल्ह्याच्या तापमान 45 अंशावर येऊन ठेवलेला आहे आणि या उन्हाचा आता सर्वसामान्य नागरिकां बरोबर जनजीवनावर सुद्धा बसत असल्याचे दिसून येत आहे. आमगाव नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या वार्ड नंबर ६ मध्ये पाणी समस्यांनी आपलं तोंड वर काढला असल्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत होती आणि त्याकरिता या येथे नागरिकांनी नगरपरिषदेला वारंवार विनंती केली की या वार्ड मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा आणि त्याकरिता या परिसरात आता टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तात्पुरती का होईना पाण्याची सोय येतील परिसरातील नागरिकांना झाली आहे.
      आमगाव नगरपरिषद अंतर्गत असलेला वार्ड नंबर ६ समस्येच्या माहेरघर आहे येथील परिसरात दगडी परिसर असल्याने या भागामध्ये विहीर ,बोरवेल मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आला आहे. परंतु उन्हाळा लागला म्हणजे पाण्याची समस्या निर्माण होते. मार्च महिन्यातच येतील विहीर, बोरवेल यांनी या यांच्या पाण्याचा पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासोबतच आवश्यक असलेला पाण्यासाठी इतरत्र धाव घ्यावी लागत होती. येथील महिला,पुरुष, मुले हे एक ते दीड किलोमीटर जाऊन पाणी आणत असल्याचे चित्र होते याविषयी नगरपरिषदेला वारंवार विनंती केली आणि तेव्हा कुठे आता नगरपरिषदेला जाग आल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून येथील परिसरात मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर आवश्यक पाणी साठी आता या परिसरामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे तरी येथे नागरिकांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी योजना या परिसरात आणावी आणि तसेच या भागामध्ये नळ योजना सुरू करावी याबाबत नगरपरिषदेला विनंती केली आहे. आता याकडे नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांच्या लक्ष लागलेला आहे.