‘जागतिक क्लब फूट डे’ निमित्त जनजागृती

0
44

गोंदिया / धनराज भगत

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर बी एस के
बाल स्वास्थ आरोग्य कार्यक्रम मार्फत स्थानिक राजेगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत बालरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक क्लब फूट डे निमित्ताने दिनांक 3 जून 2024 रोजी जनजागृती व बालकांचे स्क्रिनिंग कॅम्प चे उद्घाटन के टी एस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डी आई सी गोंदिया चे मॅनेजर पारस लोणारे डॉ. बोरकर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधिपरिचरिका सौ इंदिराताई पटले औषधी निर्माण अधिकारी अश्विनी सातपुते
बाल रोग अधिपरिचरिका मोहिनी आणि अंतरवासीता डॉ. प्रगती येलेकर डॉ. आकांक्षा डॉ. साक्षी डॉ. विकास चौधरी डॉ. मिहीर बंड ,डॉ. रितीक उन्हाळे डॉ अजिंक्य चांदेकर डॉ आनंद गोडेरा आदी उपस्थित होते.
डॉ सुवर्णा हुबेकर यांनी जागतिक क्लब फूट डे बाबत माहिती देताना सांगितले की नवजात शिशु ला जन्मजात अस्थीव्यंग म्हणजे वाकडे पाय असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही किंवा त्याला जन्म भर अपंग राहण्याचे दुःख आता असणार नाही कारण महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशासन तर्फे राष्ट्रीय शिशु स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत डी आय सी केंद्रातून अशा खास बालकांची मोफत रोगनिदान व उपचाराची सुविधा आता मोफत सुरू केलेले आहे.
त्याचा लाभ घेतला पाहिजे,असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित माता पालक यांना केले.
या वेळी औषधी निर्माण अधिकारी अश्विनी सातपुते यांनी देखील आरोग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन अधिपरिचरिका जयशीला पटले यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ विजय सिरसाम यांनी व्यक्त केले.

Previous articleआमगाव नगर परिषदेत पाण्यासाठी आता टँकर ने पाणीपुरवठा…
Next articleगोपाल ने ६६२अंको के साथ “नीट परीक्षा” मे पाई सफलता