वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-5 जून 2024
वर्धा जिल्हा 16 वी लोकसभा निवडणूक 2024 भाजपा पार्टी तर्फे रामदास तडस यांना तिकीट देण्यात आले.2 वेळा 10 वर्ष खासदार असलेले तिसऱ्यांदा विजयाची प्रतीक्षा तर इंडिया अलायंस ( शरद पवार) गट तुतारी चिन्हावरील उमेदवार अमर शरद काळे यांना तिकीट निश्चित करण्यात आले.
दोन्ही उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती. एक्झिट पोल ने केलेल्या भविष्यवाणीवर खासदार तडस तिसऱ्यांदा विजयी होतील असे भाकीत करण्यात आले होते, परंतु मतदानाचा कौल हा नाराजीचा असल्यामुळे त्यांना विजय प्राप्त करता आला नाही. पहिल्या फेरीपासूनच खा. तडस हे पिछाडीवर होते.
अंतिम फेरीतील निकालाची एकुण आकडेवारी अमर काळे 5,33,106 तर रामदास तडस : 4,51458 इतके मतदान प्राप्त झालें 81,646 मताने अमर काळे यांना विजय प्राप्त झाला.

