छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0
18
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला . राज्याभिषेक सोहळासाठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला या अलौकिक दिवसाची आठवण म्हणून  दिनांक 6 जून 2024 रोज गुरूवारला छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पंचामृत इत्यादी च्या सहाय्याने अभिषिक्त मंत्रोच्चारनाच्या पवित्र वातावरणात शास्त्रोक्त पद्धतीने दीपप्रज्वलन, पूजन व माल्यार्पण करून सोहळा संपन्न झाला. तसेच राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत सामाजिक चळवळीत वंचितांच्या न्यायासाठी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चा सहभाग सक्रियरित्या व्हावा या दृष्टीने महिला विचार मंच, शेतमजूर शेतकरी गर्जना, व कामगार सेना या तीन शाखांची स्थापना व शुभारंभ फित कापून करण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठानचे सचिव प्रा. अमोल उमरकर, प्रा. अरविंद सेलोकर, श्री. मयूर जावळकर, भोयरजी प्रतिष्ठानचे निष्ठावान मावळे अंकुश गभने, सुमित जिभकाटे,प्रज्वल बुधे, हौसिलाल ठाकरे, प्रवीण कनपटे, आश्विन बडवाईक, मनोज बोपचे,संकेत बुधे, विवेक ठाकरे, रितेश भलावे, कार्तिक जांभूळपाने, श्रेयस हलमारे, युवणेश धांडे, दीपाली मते, पूजा सिंगजुडे, गुंजन ढबाले, खुशी भोयर, आश्र्वी गाढवे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री. रामरतनजी धांडे, प्रदीपजी गोलिवार, उषाताई मलेवार, रुखमाताई धांडे, ज्योतीताई गोलीवार इत्यादी उपस्थित होते.