सहा लाखाची लाच घेताना अटक…

0
61
अकोला : लाचलूचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत सिल्वर अपार्टमेंट तिरुपती सिटी वाशिम येथील दिग्विजय हेमनाथ राठोड वय 54 वर्ष पद जिल्हा उपनिबंधक वर्ग -1 सहकारी संस्था वाशिम राहणार साई विहार रेसिडेन्सी पाषाण सुस रोड पुणे 21 ह. मु. सिल्वर अपार्टमेंट तिरुपती सिटी फ्लॅट नंबर 506 वाशिम यांनी तक्रारदार पुरुष, वय 46 वर्ष रा. मंगरूळपीर यांच्या कडून लाच  रक्कम 9 लाखाची मागणी केली असता 6 लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना दि 6 जून 2024 रोजी घड़कीस आली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
पोलीस उप अधीक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अकोला
@दुरध्वनी क्रं – 0724 2420370
@टोल फ्रि क्रं 1064
सदर घटना असी की, यातील तक्रारदार यांचे प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी आलोसे दिग्विजय राठोड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांनी 9,00,000/-रुपये लाचीची मागणी करून यापूर्वी तक्रारदार यांचे कडून 2,50,000/- रुपये स्वीकारले आहेत व उर्वरित 6,50,000/- लाचेसाठी तक्रारदार यांना तकादा लावून मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 04 जून 2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दिल्याने नमूद तक्रारीच्या अनुषंगाने दि. 06 जून 2024 रोजी पडताळणी कारवाई केली असता आरोपी लोकसेवक यांनी तडजोडीअंती तक्रारदारास 6,00,000/-रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सापळा कारवाई आजमावली असता तक्रारदार यांनी लाच रक्कम 6,00,000/- रुपये स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
उपरोक्त सापळा यशस्वीतेसाठी मा. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक,मा. अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र,अमरावती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सापळा अधिकारी सचिन सावंत पोलीस निरीक्षक लाप्रवि अकोला, कारवाई पथकात पोलीस निरीक्षक सचिन सावंत,नरेंद्र खैरनार पोलिस अंमलदार,दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार ला प्र वी अकोला घटक यांनी अथक परिश्रम केले.