गोंदियाच्या शहारवाणी परिसराला वादळी पावसाचा तडाखा… झाडे व विद्युत खांबांची पडझड… तर अनेक घरांवरील छत उडाले…

0
13
1

गोंदिया / धनराज भगत

काल दि.०७ जून २०२४ शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा शहारवाणी परिसराला बसला आहे. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्र्याचे छत उडाले. तसेच झाडांची आणि विद्युत खांबांची पडझड झाली. गोंदिया जिल्ह्यातील शहारवाणी परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास १५ ते २० मिनिटे झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांनी आता शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.