वॉर्डातील दारू बंद करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाची निवेदनातून मागणी.

0
81

प्रफुल कोटांगले

गडचिरोर्ली ( चामोर्शी ) –

गडाचिरोर्ली जिल्हा हा 1993 साली दारु बंद करण्यात आला मात्र गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात सर्रास देशी दारु, इंग्लीश दारु, मोहफुलाची दारु विक्री तसेच सट्टा बाजी केल्या जात आहे. त्या मुळे अनेक कुटुंब हे रस्त्यावर आल्याचे चित्रे दिसून येत आहे. आबेडकर वॉर्ड क्रमांक 8 मधील दारु विक्रेते हे सर्रास पने अवैध दारू विक्री करीत असून सर्रास पने त्यांना दारु विक्रीचे प्रमाणपत्र मिळाल्या प्रमाणे सर्रास पने अवैध दारू विक्री केली जात आहे, अवैध दारू विक्री सोबतच थंड पाण्याची व्यवस्था तसेच दारू पिण्याऱ्यास चकण्याची सुविधा होत असल्याकारणाने गावातील नागरिक हे वॉर्ड क्रमांक 8 येते दारु पिण्याकरीता येतात त्या मुळे वॉर्डातील बौध्द बांधव तसेच इतर सुज्ञ नागरिक त्रत झाले असून बोद्ध विहाराच्या मागे आणि पुढे दारु विक्री जोमात चालु आहे आणि बौद्ध विहाराच्या आवारात दारुचा बाटला पडुन राहतात. वंदनेसाठी गेलेल्या महिलांना अवैध दारु विक्री मुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दारु पिऊन वार्डामध्ये दारु प्राशन करून दारुडे हे अश्लिल शब्दात शिवीगाळ करित असतात दारु पिऊन पडुन राहत असल्याकारणाने वार्डातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वार्डातील अवैद्य दारु विक्री थांबविण्याची विनंती चामोर्शी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डातील त्रस्त महिला व पुरुषांनी तहसील कार्यालय,नगर पंचायत कार्यालय तसेच चामोर्शिचे पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असताना देशी विदेशी दारू येते कुठून आणि अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांना निवेदन देऊन मागणी करण्याची वेळ येत आहे. तर संबंधित विभाग अवैध दारू विक्रेत्यांना पाठिशी घालत आहे का? असा सवाल वॉर्ड क्रमांक 8 येतील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे.