उमाशंकर पटले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
12
1
तिरोडा :- तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पालडोंगरी गावचे माजी पोलीस पटेल, स्व.खेमराजभाऊ पटले, त्यांचे सुपुत्र उमाशंकर पटले यांनी माजी खासदार, आमदार  खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्तेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी युवा नेते रविकांत बोपचे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून  पटले यांचे पक्षात स्वागत केले.

डॉ. टी.के. पटले आणि प्रा.जे.के. पटले, त्यांचे धाकटे बंधू उमाशंकर पटले यांनी यापूर्वी विविध राजकीय पदांवर काम केले आहे. यासह तिरोडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, तालुका झोपापट्टी सेल अध्यक्ष, ग्राम युवा संघर्ष वाहिनी अध्यक्ष, पोलीस पाटील आदी पदांवर काम केले आहे.
विशाखा इंडस्ट्रीज मौदाचे सेवानिवृत्त वस्त्रोद्योग अधिकारी श्री उमाशंकर पटले यांचे नुकतेच बोरा गावात कार्यकर्ता मेळाव्यात भव्य स्वागत करण्यात आले.