नेत्रदान श्रेष्ठ दान – डॉ सुवर्णा हुबेकर

0
15
1

गोंदिया / धनराज भगत

राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे
जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने 10 जून रोजी बाहय रुग्ण विभागात नेत्रदान जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जागतिक दृष्टीदान दिन जनगजागृती अभियानाचे उदघाटन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेत्र शल्य चिकित्सक डॉ उत्तम चौधरी, डॉ मिहीर बंड ,डॉ प्रगती येलेकर ,जयशीला पटले रितेश निशाणे,सौ योगिता रहांगडाले,अधिपरिचरिका मनीषा बोळणे
औषधी निर्माण अधिकारी,अश्विनी सातपुते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या, महाराष्ट्रात आज ही सुमारे 4 लाख दृष्टीहीन लोक नेत्रपटलाच्या प्रतीक्षेत आहेत
परंतु आपल्या तुन 2 टक्के लोक सुद्धा नेत्रदान बाबत जागृत नाहीत.
त्यामुळे जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 10 जून रोजी जनतेला
नेत्र दाना चे महत्त्व कळावे म्हणून जागतिक नेत्र दान दिन जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ ने आपला नेत्र दान संकल्प पत्र भरून मरणोत्तर नेत्रदान चा आग्रह केला. या वेळी बाहय रुग्ण विभागात नेत्र दान बाबत आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.

उपरोक्त कार्यक्रमाचे संयोजन श्रीमंत जयशीला पटले यांनी केले, तर आभार प्रदर्शन पायल नानेट यांनी केले.