संसद भवन परिसरातील थोर पुढाऱ्यांचे पुतळे हटविन्याच्या विरोधात कांग्रेस कमेटी तर्फे तहसीलदार यांना निवेदन

0
51
आमगांव : आज दि. १०/०६/२०२४ ला संसद भवन च्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा पुतळा हटविण्यात आला. या प्रकरणावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी म्हणून कॉंग्रस कमेटी आमगाव द्वारा तहसिलदार साहेब यांच्या मार्फत मा. राष्ट्रपतीला निवेदन देण्यात आले.
त्या प्रसंगी उपस्थित संजय  बाहेकर, तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस कमेटी आमगाव, रामेश्वर  श्यामकुवर अनु. जाती अध्यक्ष, कॉंग्रेस कमेटी आमगाव,सौ. प्रभाताई उपराडे महिला अध्यक्ष , कॉंग्रेस कमेटी आमगाव,महेश उके संचालक कॉंग्रेस कमेटी आमगाव,सौ. छबुताई उके जिल्हा परिषद सदस्य,कॉंग्रेस कमेटी आमगाव,उज्वल बैस जिल्हा महासचिव,कॉंग्रेस कमेटी आमगाव,पिंकेश शेंडे अनु. जाती उपाध्यक्ष,कॉंग्रेस कमेटी आमगाव, प्रशांत रावते व अन्य कॉंग्रस कमिटी सदस्य उपस्थित होते.
Previous articleनेत्रदान श्रेष्ठ दान – डॉ सुवर्णा हुबेकर
Next articleमागील वर्षी झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पिकवीमासह शासकीय आर्थिक मदत द्या…….