बाम्हणी रेल्वे चौकी जवळ सापडले पायाला शर्ट बांधलेले मृतदेह

0
34
1

रेल्वे रुळावर मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ

आमगांव : आमगाव – देवरी महामार्गावरील द.पु रेलवे लाईन स्थित असलेल्या बाम्हणी रेल्वे चौकी जवळ रेल्वे लाईन ला लागून मृतदेह पडून असल्याची घटना समोर आलेली आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेश तुकाराम शिवणकर(५५) रा. भजेपार असे सांगीतले जात आहे. सदर मृत व्यक्ती सालेकसा तालुक्याचा राहणारा असून राजेश शिवणकर दि.१० जून रात्री दहा नंतर घरून निघाल्याचे सांगितले जात आहे.
सदर घटनेविषयी मृतकाच्या नातेवाईकास विचारपूस केली असता सदर व्यक्ती रात्री जेवणानंतर सायकलने घराबाहेर निघाला परंतु दर दिवस प्रमाणे गावातच कुठेतरी गेला असल्याचे घरच्या लोकांना वाटले पण खूप रात्र झाल्याने घरी न परतल्याने घरच्या लोकांनी शोध घ्यायला सुरुवात केली व आज सकाळी राजेश शिवणकर यांचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याने राजेशच्या नातेवाईकात व गावात शोकांतिका पसरलेली आहे.
महत्वाची बाब म्हणजे मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजुला सापडल्याने व मृतदेहाचा पायाला शर्ट बांधून असल्याने हा अपघात आहे की घात पात ? अशी शंका वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलीसांनी घटना स्थळ गाठत पुढील कार्यवाही करत आहे.