गोंदिया / धनराज भगत
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंमागाकरीता आवश्यक धान बियाणे जिल्हा निधी अंतर्गत 50 टक्के सुटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्याकरीता आवश्यक प्रमाणपत्र पंचायत समिती अंतर्गत कृषि अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकडून परमीट प्रमाणपत्र प्राप्त करुन आवश्यक धान बियाणाची उचल करता येईल. असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, कृषि व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे व कृषि विकास अधिकारी महेंद्र मळामे यांनी केले आहे.

