कोणताही ताप हिवताप असू शकतो – डॉ सुवर्णा हुबेकर

0
47

गोंदिया / धनराज भगत

राष्ट्रीय कीटक जन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत
स्थानिक रजेगाव ग्रामीण रुग्णालयात 10 जून पासून
हिवताप प्रतिरोध महिना म्हणून जनजगृती अभियान
आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय कीटक जन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत या जनजागृती अभियानाचे उदघाटन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी डॉ चोपकर, डॉ रितीक उन्हाळे, डॉ मिहीर बंड, अधिपरीचारक  दीपक पटले, औषधी निर्माण अधिकारी अश्विनी सातपुते, एच एल एल च्या श्रीमती कटरे रितेश निशाणे ब्रदर डे केयर च्या जयशीला पटले योगिता रहांगडाले आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
     याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जातो. गोंदिया जिल्हा जंगल व्याप्त असल्याने इकडे मलेरिया चे प्रमाण जास्त आहे म्हणून मान्सून पूर्व मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना बाबत जनतेला जागृत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
      डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की तेंदू पत्ता तोडणी साठी शेजारील राज्यातून परतलेल्या ग्रामस्थांनी आपल्या जवळच्या उपकेंद्रातून रक्त तपासणी त्वरित करून
घ्यावी व मलेरिया प्रतिबंधक औषधी उपचार करून घ्यावे.
राष्ट्रीय कीटक जन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मलेरिया डेंग्यू चिकूनगुनिया आदी बाबत डॉ सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित रुग्णांना रोगाची लक्षणे निदान व उपचार बाबत सखोल माहिती दिली. कोणताही ताप हिवताप असू शकतो. म्हणून तात्काळ जवळच्या आरोग्यकेंद्रात जाऊन निशुल्क मलेरिया स्क्रिनिंग टेस्ट केलीच पाहिजे असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.
       मलेरिया डेंग्यू या सारखे डासांमुळे पसरणाऱ्या रोगावर प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन पाळण्याचे आवाहन या प्रसंगी डॉ सुवर्णा हुबेकर
यांनी केले.
     रुग्णालयाच्या औषधी निर्माण अधिकारी श्रीमती अश्विनी सातपुते यांनी माहिती दिली की मलेरिया प्रतिबंधक सर्व औषधी साठा ग्रामीण रुग्णालयात भरपूर उपलब्ध आहे तरी ग्रामीण जनतेने कोणताही ताप अंगावर काढू नये.
राष्ट्रीय कीटक जन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जनजागृती अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात हिवताप डेंगू चिकूनगुनिया आदी बाबत आरोग्य प्रदर्शनी आयोजित केली होती, त्याचा लाभ रुग्ण व नातेवाईक यांनी घेतला.
कार्यक्रमाचे संचालन मनीषा बोहणे यांनी केले तर आभार प्रदर्शन राऊत यांनी केले .