नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार,ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते रूग्ण वाहीकेचे लोकार्पण

0
11
1

*अहेरी :* राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते शुक्रवार ७ जून रोजी अहेरी येथील हकीम लॉन मध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमात सुविधायुक्त रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

 

लोकार्पण सोहळ्यात मंचावर सिनेअभिनेत्री ईशा कोप्पीकर, मध्य प्रदेश येथील जनजाती कल्याण मंत्री ना. विजय शहा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राजेश पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ठाणे येथील मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या अग्ग्रगण्य औषध उत्पादक कंपनीने सीएसआर कार्यक्रमा अंतर्गत शुभम बहुद्देशीय शिक्षण संस्था या संस्थेला रुग्णवाहिका प्रदान केली असून सदर संस्थेने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे रुग्णवाहिका हस्तांतरीत केले आहे. अहेरी व ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले असून मेयरच्या या स्तुत्यप्रिय उपक्रमामुळे उत्तम आरोग्य सेवा व ग्रामीण भागाला याचा लाभ मिळणार आहे.

मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेश तावडे यांनीही मार्गदर्शन केले. या रूग्णवाहीकेमुळे आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी साथ व लाभ मिळणार आहे.

 

*ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा पोहचविणार – ना आत्राम*

 

या प्रसंगी ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची योग्य सोय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमची धडपड असून सुसज्ज व सुविधा युक्त नवीन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होत असल्याने मेयर कंपनीचे आभार मानून आणि प्रत्येक कंपनीने सीएसआर मार्फत आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष घालण्याचे आवाहन केले.