शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी घेतली पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्याशी भेट

0
19
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

भंडारा – शासनाने सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काल दि.१२ जून ला जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांची मंत्रालय मुंबईत भेट घेतली.गेल्या दोन महिन्यांत भंडारा जिल्ह्य़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे 90 टक्के नुकसान झाले . दर आठवड्याला पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक हेक्टर भातशेती भुईसपाट झाली असून, त्याचा खर्चही काढणे कठीण झाले आहे.त्यामध्ये तुमसर व मोहाडी तालुक्याला जास्त फटका बसला आहे. जिल्हाधिकारी भंडारा यानी आपल्या स्तरावरुन काढलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यानी शेतात जाऊन पंचनामा जरुर केला. परंतू नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने तसे आदेश अजूनही दिलेले नाही. मागील महिन्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटी मुळे रब्बी पिकांसह भाजीपाला,आंबा ई.पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई राज्य सरकार ने जाहीर करावी.अशी मागणी किसान मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस माजी खा.शिशुपाल पटले यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे केली होती.परंतु आज पावेतो तसे आदेश राज्य सरकारकडून निघालेले नाहीत.आचार संहितेचा कारणाने सरकारला निर्णय घेता आला नसेल परंतु आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पुढाकार घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार गावित यांची नुकतीच मुंबईत भेट घेटली व येत्या २७ जून पासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.येत्या अधिवेशनात यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.