अहेरी. मागील दहा ते पंधरा वर्षापासून
हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती तसेच कृषी विभागाच्या उदासीनतेमुळे अहेरी तालुक्यात कापसाचे उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले आहे, मागील दहा वर्षापासून पर प्रांतातील भू माफिया एजंट अहेरी तालुक्यात ठिय्या मांडलेला आहे
अल्प मोबदल्यात जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन कापसाची शेती केल्या जात आहे यांच्याकडून
नसलेल्या अनधिकृत तणनाशक बी टी आर आर बी टी आणि बीटीसीजी-3. बीटी लायसिल तसेच कापूस पिकासाठी बंदी असलेले कीटकनाशक खताचा अवैद्य छुप्या पद्धतीने मन मर्जी भावाने विक्री आणि वापर केला जातो, मुख्यतः आंध्र प्रदेश आणि तेलंगाना राज्यातील शेतमाफीया एजंटा मार्फत गरीब शेतकऱ्यांकडून बळजबरीने अल्प भाडेतत्त्वावर हजारो एकर जमीनी घेऊन बंदी असलेल्या बियाणे आणि रासायनिक औषधी खतांचा अवैध पद्धतीने केला जातो मुख्याता गा क्सोफेट तणनाशकेच्या अति वापरामुळे माती सजीव संवर्धन परिसंख्या, ( पक्षी मासे फायदेशीर कीटक. सामान्य वनस्पती) विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे, शेतजमिनी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केली जाणारी संपत्ती आहे. ही संपत्ती बंजार होण्याच्या मार्गावर आलेली आहे यासाठी कृषी विभागाची उदासीनता स्पष्ट लक्षात येत आहे चौकशी करून या प्रकरणात एजंट आणि अधिकारी यांच्यावर सदोष गुन्हा नोंदविण्यात यावा कठोर कार्यवाहीची तरतूद करण्यात यावी, प्रशासन आणि कृषी विभागामार्फत या तालुक्यातील शेतकऱ्याच्या उन्नती करता संशोधन करून उज्वल भविष्याचा पाया रचण्यात यावा भविष्यात शेतजमिनी पर राज्यातील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देता येणार नाही अशी तरतूद करण्यात यावी येथे सात दिवसात आरोपी एजंट आणि आरोपी अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी डॉक्टर निसार हकीम अहेरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष व गणेश उपलपवार, छत्रपती आलोने, गजानन झाडे, सत्यनारायण डोंगरे मधुकर सडमेक, हनीफ भाई शेख, राघोबा गौरकर, सुमित झाडे, विशाल गण मुकुलवार, विशाल गजाडीवार, राहुल दुर्गे, सुमित नारायण दुर्गे, अजय दा माजी रत्नम. विनोद गर्गम, पुरुषोत्तम गरगम, शिवलिंगु लहानू गर्गम, ईश्वर टेकूल व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

