मुख्याध्यापक जनक अंबादे यांचे दुःखद निधन

0
14
1

आमगांव : येथील प.स.अंतर्गत जि.प.शाळा सरकारटोला येथे कार्यरत इंद्रप्रस्थ नगर निवासी मुख्याध्यापक जनक किसन अंबादे(वय-५७) यांचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात उपचार दरम्यान आज (ता.१४)ला सकाळी १०.३० वाजता किंग्सवे हॉस्पिटल नागपुर येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या(ता.१५) सकाळी १० वाजता स्थानिक शिव मोक्षधाम (गोंदिया रोड़) येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व आप्तपरिवार आहे.