सालेकसा/ बाजीराव तरोने
नगर पंचायत सालेकसा अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण नगर पंचायत क्षेत्रात जसे आमगाव खुर्द, मुरूमटोला, हलबीटोला, रामनगर,सालेकसा, जांभळी, बाकलसर्रा, कोवाचीटोला ह्या भागात कित्येक महिने पासून पथदिवे (स्ट्रीट लाईट) बंद आहेत, तुटलेले आहेत. नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला वेळोवेळी तक्रार केलेली आहे परंतु कंत्राटदार तर्फे सदर कामे होत नाही आहे असे उत्तर मिळत आहे. यापूर्वी सुद्धा दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी ह्याच विषयावर निवेदन देण्यात आले, परंतु पथदिवे लावण्याचे काम करण्यात आलेले नाही. आता पावसाळा सुरू होत आहे आणि लोकांच्या घरासमोर अंधार राहत आहे याच्यामुळे कुठलेही अपघात /दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कंत्राट दार सदर कामे करत नसेल तर नगर पंचायत प्रशासन आपल्या कुठल्या ही निधीतून हे काम करावे करिता पुन्हा १४ जुन २०२४ रोजी नगर पंचायत मुख्याधिकारी/ प्रशासक यांच्या नावाने निवेदन देण्यात आले आणि विनंती करण्यात आली आहे की पावसाळ्यापूर्वी एका आठवड्याच्या आत सर्व पथदिवे (स्ट्रीट लाइट) लावण्यात यावे.अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य ब्रजभूषण बैस यांनी केली आहे.

