1
अंजोरा (भालीटोला) येथील बकऱ्या चोरांवर पोलिसांचा आश्रय
चार महिने ओलांढले तरी काही कारवाई नाही
जिला क्राईम ब्रांच मार्फत चौकशी करावी अशी जिला पोलीस अधीक्षककाला पिडीत शेतकऱ्याची मागणी
आमगांव : अंजोरा (भालीटोला) येथील शेतकरी भिवा वाढई यांनी पत्रकार परिषद घेउन सांगीतले की 5 मार्च 2024 रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दोन बक-या चोरी गेल्या म्हणून तक्रार दाखल केली होती, मात्र आज पर्यंत पोलिसांनी बकरी चोरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस बक-या चोरट्यांना आश्रय देत आहेत, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदाराने केलेल्या चोरीच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे किवा साक्षीदार न मिळाल्यामुळे आम्ही कारवाई करण्यास असमर्थ आहोत. ही घटना राजकीय व जुन्या वैमनस्यातून घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शनी निदर्शनात आले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी ज्या व्यक्तींवर आरोप केलेला आहे, त्यांच्याबद्दल सबळ पुरावे व साक्षीदार सादर करावे, असे तक्रारकर्त्यांला कळविले आहे.
– युवराज हांडे, पोलिस निरीक्षक, आमगाव