दोन भावंडांवर गुन्हा दाखल : पाच जणांची झाली फसवणूक
गोंदिया : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ७ ते ८ टक्केप्रमाणे प्रतिमहिना परतावा देण्याचे आमिष दाखवत तीन कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण बनिया मोहल्ला आमगाव येथे नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणात दोन जणांना आमगाव पोलिसांनी अटक केली आहे.
जमीन विक्रीचे पैसे आरोपींना दिले
कमैया यांच्याकडे माल्ही येथील जमीन विक्रीचे १ कोटी ३५ लाख रुपये घरी होते. त्यांनी २९ एप्रिल २०२३ ला २५ लाख, ७ जुलै २०२३ ला २० लाख, ११ ऑगस्ट २०२३ ला १ लाख, १० ऑक्टोबर २०२३ ला ७५ हजार, ११ डिसेंबर २०२३ रोजी १५ लाख असे ६१ लाख ७५ हजार रुपये चेकव्दारे आरोपींना दिले. डिसेंबर २०२३ मध्ये उर्वरित ८५ लाख रुपये कॅशमध्ये पंडित अनिल गोविंदप्रसाद गौतम व रामकिसन भैय्याजी शिवणकर (रा. बनगाव) यांच्या समोर किसन पांडे यांना त्यांच्या घरी दिले.
या चौघांची झाली फसवणूक
बनगाव येथील चल्युराज व्यंकट- रंगप्पा कमैया(५८) यांच्यासह रश्मी ओकार शेंडे (६०, रा. आमगाव) यांच्याकडून जुलै २०२३मध्ये १२ लाख रुपये, मनोहर हरिचंद बावणकर (५८, रा. बनगाव) यांच्याकडून १ जून २०२१पासून २ कोटी रुपये, नारायण धनलाल उपराडे (७०, रा. बनगाव) यांच्याकडून १५ डिसेंबर २०२१ पासून ११ लाख रुपये घेऊन आरोपींनी त्यांची फसवणूक केली. या चौघांकडून आरोपींनी ३ कोटी १९ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत पुढे आले आहे.