समाजसेवी तथा से.नि.प्राचार्य खुशाल कटरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

0
25
1

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणविस पदाची जबाबदारी स्विकारणार

गोंदिया / धनराज भगत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने रविवार ता.16 जून रोजी कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन पार्टी मुख्यालय गोंदिया येथे करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची स्थिती गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण भारतात भक्कम व्हावी म्हणून संघटण बांधणी चे कार्य जोमाने सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर वरीष्ठ समाजसेवी व से.नि.प्राचार्य खुशाल कटरे यांचा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश स्विकारण्यात आला.
खुशाल कटरे यांनी विविध सामाजिक व प्रशासनिक संघटनेत उच्चस्तरीय पदावर सेवा दिलेली असल्याने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे गोरेगांव तालुकाध्यक्ष केवलरामभाऊ बघेले यांनी माजी आमदार राजेंद्र जैन व गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्यासी चर्चा करून खुशाल कटरे यांना गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या कडे करण्यात आलेली आहे.
आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे गोरेगांव तालुकाध्यक्ष केवलरामभाऊ बघेले, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष डाॅ.अविनाश काशीवार ,जिप सदस्य सौ.सुधाताई रहांगडाले ,माजी जिप सदस्य किशोर तरोणे यांच्या कार्याचा श्री.कटरे यांच्यावर सकारात्मक प्रभाव आहे.
खुशाल कटरे ,गोंदिया जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पद स्विकारून राष्ट्रवादी पक्ष बांधणीत सहकार्य करणार आहेत.
पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी चे पुढिल कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार प्रफुलभाई पटेल,आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन,गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, गोरेगांव तालुध्यक्ष केवलरामभाऊ बघेले सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष डाॅ.अविनाश काशीवार ,उपसरपंच घनेश्वरजी तिरेले ग्रा.पं.पाथरी, सरपंच अनिल मडावी ग्रा.पं.कुर्हाडी,सरपंच सुनिल कापसे ग्रा.पं.मेंगाटोला, संचालक महेंद्र चौधरी कृउबा.समीती गोरेगांव, संचालक डाॅ.श्रीप्रकाश रहांगडाले खरेदी विक्री संस्था गोरेगांव, राष्ट्रवादी गोरेगांव तालुका युवक अध्यक्ष सुरेंद्र रहांगडाले गोरेगांव, विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रतिक पारधी ता.गोरेगांव, युवक अध्यक्ष राजकुमारजी बघेले फुलचूर उपस्थित होते.