आलापल्ली-भामरागड महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, जिल्हाधिकारी गडचिरोली यांना अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन सादर

0
5
1

अहेरी..हा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे तसेच जीवनातील मूलभूत अधिकारांमध्ये दळणवळणाची व्यवस्था हि शासनाची मुख्य जवाबदारी असतांना ,या मार्गाचे काम नक्षल्यांची दहशत तसेच वनकायद्यामुळे मागील कित्तेक वर्षापूसून रखडलेले होते. त्यामुळे या भागातील लोकांसाठी दळणवळणाची समस्या फार गंभीर होती .पण कालांतराने या मार्गावरील आम्हाला मुहूर्त मिळाला आणि नवीन निविदे नुसार महामार्गाची निविदा कंत्राटदार यांना प्राप्त झाली ,पण या कंत्राटदारमार्फत चालू असलेल्या महामार्गाचे काम हे अत्यंत बोगस ,निकृष्ट दर्जाचे,नियम बाहय पद्धतीने शासनाचे नियम धारेवर धरून केले जात आहे .

या भागात उदरनिर्वाहाचे मुख्य दुवा म्हणजे दळणवळण. या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाह आणण्याकरिता शासनामार्फत भरपूर निधी उपलब्ध केली जाते पण या अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांमुळे या भागाचा विकास रखडत चालला आहे येणारा मान्सून आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रची गंभीरता लक्षात घेता या आलापल्ली-भामरागड महामार्ग निर्माणीकरण निकृष्ट दर्जाच्या कामाची महामार्ग उपअभियंता अभियंता तसेच कनिष्ट अभियंतायांना पूर्वकल्पना देऊनही कंत्राटदाराकडून कामांमध्ये कोणत्याच प्रकारची सुधारणा करण्यात आली नाही . यामुळे महामार्ग देखरेख विभाग यांची भुमीका संशयास्पद आहे हे स्पष्ट होते. आदिवासी समाजाशी होणार अन्याय बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. येत्या 48 तासात महामार्गाचे बोगस काम थांबवून कामाची चौकशी करून शासन निविदा नियमानुसार काम पूर्ण करण्यात यावे .अन्यथा अहेरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ( चक्काजाम ) तीव्र जनआंदोलन छेडण्यात येणार आणि याचे सर्वस्वी जवाबदार प्रशासन राहील .

असे निवेदन डॉ निसार हकीम तालुकाध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमिटी आणि पदाधिकारी मधुकर सडमेक ,हनीफ शेख गणेश उपलपवर ,अजय सडमेक ,राघोबा गावकर, सुमित झाडे ,अन्य कार्यकर्त्यांनी निवेदनामार्फत देण्यात आले आहे