सोलापूर येथे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने अँड लखनसिंह कटरे सम्मानित

0
8
1

गोंदिया : दि.१६ जून २०२४ रोजी सोलापूर येथे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारोह संपन्न झाले असून, गोंदिया जिल्ह्यातील  आमगांव तालुका अंतर्गत बोरकन्हार निवासी जेष्ठ साहित्यिक अँड लखनसिंह कटरे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रकाश महानवर, “मी अश्वत्थामा…चिरंजीव स्वगत” या ख्यातनाम कादंबरीसह ५७ नाटकांचे लेखक तथा कित्येक नाटकांतून, चित्रपटांतून व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करून नावाजलेले ज्येष्ठ नाट्य, सिनेकलावंत अशोक समेळ आणि मनोरमा बँक परिवार, सोलापूर चे आधारस्तंभ मा.श्रीकांत मोरे यांच्या हस्ते अँड लखनसिंह कटरे यांना ‘मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.