
चंदपूर :- संतोष उत्तम झाडे यांची महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग युवा ग्रामीण पत्रकार संघ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदर तत्पर काम करणारा संघ म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ होय.
संतोष उत्तम झाडे यांनी काही वर्षा अगोदर पासून पत्रकारितेला सुरुवात केली. आणि आज राज्य दैनिक बाळकडू चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जिल्हास्तरावर काम करत असताना पत्रकारिता म्हणजे काय हे अनुभव त्यांना मिळाले. त्यांच्या उत्तम कामाची दखल घेत त्यांना
युवा ग्रामीण पत्रकार संघा मध्ये विदर्भ विभाग उपाध्यक्ष पदावर काम करण्याची मोठी जबाबदारी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन त्यांच्यावर सोपवली. तेव्हा संतोष झाडे यांनी ती जबाबदारी निर्भय व निर्भिड पणे सांभाळेल व सर्व सामान्य जनतेचे मत ऐकून त्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी शासन, प्रशासन विरोधात असेल किंवा कोणतेही प्रश्न असतील ते त्यांना हक्क मिळवून देण्याचे विश्वासाने काम करेल असे संतोष झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले. त्यांची नियुक्ती झाल्या बद्दल पत्रकार प्रकाश घोगरे, दिनेश झाडे, शंकर महाकाली, सूर्यकांत अधुरे, स्वरांश गुंडेकर, जयश्री घोडके, प्रफुल कोटांगले, शरद कुकुडकर तसेच दैनिक कळंब नगरी वृत्तसेवा चे अमरावती जिल्हा ब्यूरो चीफ शशांक चौधरी यांनी तसेच इतर मित्र परिवारकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.


