निःशुल्क शिबिराचा लाभ घ्यावा : डॉ सुवर्णा हुबेकर

0
52

गोंदिया/ धनराज भगत

महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई मार्फत जागतिक सिकल सेल दिन निमित्ताने उद्या दिनांक 19 जून 24 रोजी राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्रातील प्रामुख्याने सर्व आदिवासी जिल्ह्यात मोफत सिकल सेल रोग निदान व औषधी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रजेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली.

“जागतिक सिकल सेल दिन”च्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची मोफत सिकल सेल स्क्रिनिंग एच एल एल च्या सहकार्याने केली जाणार आहे. तसेच विवाह योग्य युवक युवतींना सिकल सेल या गंभीर आजाराबाबत समुपदेशन करून सिकल स्क्रिनिंग रक्त गट चाचणी मोफत केली जाणार असल्याची माहिती डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली
गोंदिया जिल्हा सिकल ग्रस्त असल्याने जागतिक सिकल सेल दिना निमित्ताने या निःशुल्क कॅम्प चा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.

Previous articleमत्स्यपालन व्यवसायातून प्रतिमा मौजे यांची स्वयंरोजगारातून समृध्दीकडे वाटचाल
Next articleजागतिक पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा न्यायालयात जनजागृती कार्यक्रम