जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा न्यायालयात जनजागृती कार्यक्रम

0
12
1

गोंदिया/धनराज भगत

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ तसेच वृक्षधरा फाउन्डेशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा न्यायालय गोंदिया येथे 15 जून 2024 रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        प्रारंभी न्यायीक अधिकारी व वकील संघामार्फत न्यायालयीन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व संकल्पपुर्वक वृक्षांची जोपासना करण्याचे संकल्प घेण्यात आले. तसेच संपूर्ण न्यायालयीन परिसराची सफाई न्यायीक अधिकारी वर्ग, वकील संघ व न्यायीक कर्मचारी वर्ग तसेच वृक्षधरा फाउन्डेशन यांच्यामार्फत करण्यात आली.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश-1 ए.टी.असीम, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस.आर.मोकाशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के.वाळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर वाय.जे.तांबोळी, वरिष्ठ ॲड. ओ.जी.मेठी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. टी.बी.कटरे, जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. आर.ओ.कटरे व न्यायीक अधिकारी उपस्थित होते.

        यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे यांनी पर्यावरणाचे बदल व परिणाम, मानवीय अघोरीपणामुळे बसणारे चटके, पर्यावरणाचा असमतोलपणा व त्यामुळे होणाऱ्या अडचणी, पर्यावरणाला समतोल कसे आणता येणार, त्याकरिता मानवीय नैतिक जबाबदारी म्हणून आपले कार्य, केवळ बोलुन नाही तर कर्तृत्वातून पर्यावरण जोपासायला हवे असे त्यांनी सांगितले.

        कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी अधीक्षक पी.बी.अनकर, कनिष्ठ लिपीक ए.एम.गजापुरे, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, पी.डी.जेंगठे, के.एस.चौरे, एल.ए.दर्वे, लेखापाल आलेशान मेश्राम, शिपाई बी.डब्ल्यु.पारधी, आर.ए.मेंढे, सरतिमा भगत, तसेच लिगल ॲडव्हायझर डिफेन्स काउन्सील, जिल्हा वकील संघ व वृक्षधरा फाउन्डेशन यांनी मोलाचे सहकार्य केले.