सुनील तुरकर यांना वर्किंग जर्नलिस्ट यूनियन नागपुर कडून पत्रकार शिरोमणी सम्मान पुरस्कार

0
70
1

नागपूर /शुभम मदनकर

न्यूज प्रभात डिजिटल न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक सुनील तुरकर यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल वर्किंग जर्नालिस्ट युनियन नागपूर कडून पत्रकार शिरोमणी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दिनांक १७ व १८ जून रोजी नागपूर येथे वर्किंग जर्नालिस्ट युनियन (महाराष्ट्र) चे दोन दिवसीय भारतीय पत्रकार अधिवेशन (२०२४)चे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला देशभरातील नामांकित पत्रकार व संपादकांनी हजेरी लावून पत्रकारीतेची दशा व दिशा या विषयावर सांगोपांग चर्चा व मंथन करण्यात आले.

पूर्व विदर्भात न्यूज प्रभात डिजिटल न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून दुर्बल,वंचित व शोषितांना न्याय देण्याचे काम न्यूज प्रभात टीमच्या माध्यमातून अविरतपणे सुरुवात सुरू आहे. पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामाबद्दल न्यूज प्रभात चे मुख्य संपादक सुनील तुरकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना या अधिवेशनात पत्रकार शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्किंग जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष निशांत भाई , महाराष्ट्र उपाध्यक्ष रियाज शेख, महाराष्ट्र कोषाध्यक्ष गणेश सोलंकी, आदी मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.