गर्भवतींनो सिकल तपासणी करा -डॉ हुबेकर

0
29
1

गोंदिया/धनराज भगत

राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियान मार्फत दिनांक 19 जून 24 रोजी ग्रामीण रुग्णालयात मोफत सिकल सेल रक्त तपासणी कॅम्प व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्प चे उद्घाटन रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ विभू शर्मा डॉ चौधरी प्रयोगशाळा तंत्रज्ञा श्रीमती कटरे अश्विनी सातपुते व जयशीला पटले योगिता रहांगडाले डॉ थोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या वेळी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या
की सिकल सेल हा आनुवंशिक आजार असल्याने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो म्हणून प्रत्येक गर्भवतीने सिकल स्क्रिनिंग अवश्य करावी. ग्रामीण रुग्णालयात आयोजित या कॅम्प मध्ये सिकल बालकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून निःशुल्क औषधी फॉलीक ऍसिड गोळ्या,टॉनिक वैगरे देण्यात आले.
एच एल एल च्या श्रीमती कटरे यांनी कॅम्प मधील 24 बालके व 7 गर्भवती महिलांची सिकल सेल रक्त तपासणी सी बी सी टेस्ट व रक्तगट तपासणी निःशुल्क करून दिली. ज्यांची सिकल सेल टेस्ट पोसिटीव आली त्यांची कन्फर्म साठी एच पी एल सी टेस्ट करण्यात आली.अशी माहिती डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली.
कॅम्प साठी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व परमेडीकल स्टाफ ने सहकार्य केले.