शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्तीकरीता अर्ज आमंत्रित

0
37
1

गोंदिया/धनराज भगत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या मुलांची/ मुलींची शासकीय निवासी शाळा नंगपुरा (मुर्री), डव्वा व सरांडी या शाळांमध्ये वर्ग 6 वी ते 10 वी च्या अभ्यासक्रमासाठी शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशित मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित शिक्षक नियुक्त होईपर्यंत निवासी शाळांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर (निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात) सहायक शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या कार्यालयात मिळेल, असे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

         याकरीता इच्छूक प्रशिक्षीत उमेदवारांनी संबंधीत शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक यांचेकडे सर्व कागदपत्रासह अर्ज 22 जून 2024 पर्यंत सादर करावे. अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मुलाखतीसाठी 24 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा (मुर्री), ता.जि. गोंदिया येथे मुळ सर्व कागदपत्रासह उपस्थित राहावे. सविस्तर माहितीकरीता संबंधीत निवासी शाळेतील मुख्याध्यापक व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया यांचे कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी केले आहे.