तिरोडा – दि. १८ जुन २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जनसंपर्क कार्यालय, तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मा. मंजुताई डोंगरावर , जिल्हा अध्यक्ष महिला राष्ट्रवादी यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते मा. रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत पक्ष विस्तार, संघटन बांधणी, बूथ कमिटी व आगामी विधानसभा निवडणुक तथा भविष्यातील वाटचाली तथा महिला सबलीकरण आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटन विस्तारात भर टाकत तिरोडा शहर अध्यक्ष पदी श्रीमती मिनाक्षी(टिना) मंगेश हिरापूरे यांची निवड करण्यात आली. प्रासंगिक सौ. मंजुताई डोंगरवार तथा युवा नेते श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत व पक्षाचा दुपट्टा घालुन सत्कार करण्यात आले. यावेळी श्री रविकांत बोपचे यांनी नवनियुक्त शहर अध्यक्ष यांना तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधणी व पक्ष मजबुती करिता कार्य करण्याकरिता व पुढील वाटचालीकरिता शूभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वश्री महिला जिल्हा अध्यक्ष सौ. मंजूताई डोंगरवार, युवा नेते रविकांत बोपचे, महिला जिल्हा उपाध्यक्ष चंदाताई शर्मा, सौ. जयश्रीताई उपवंशी, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री केलवतकर, कार्याध्यक्ष छायाताई टेकाम, महासचिव मंदाताई टेंभरे, उपाध्यक्ष सकुनताई बोबडे, तीलवंता कोडवते, विमलताई टेंभरे, मालनताई नंदेश्वर, स्वर्णमाला साखरे, सिंधू बावनकर, ममता ठाकरे सहीत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.