आमगाव: नगर परिषद द्वारा नळाला टुल्लू पंप लावणाऱ्या नळ कनेक्शन धारकांवर कार्यवाही करुन टुल्लू पंप जप्तीची कार्यवाही(ता.१९) करण्यात आली. अनेक दिवसांपासून नळ कनेक्शन धारकांच्या नळाला पाणी पुरवठा बरोबर होतं नाही,अशा अनेक तक्रारी होत्या. कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली होती. तक्रारी वर सज्ञान घेऊन नगर परिषद आमगाव च्या पाणी पुरवठा पथकाने प्रशासक तथा तहसीलदार डाॅॱ रविंद्र होळी व मुख्याधिकारी कु.करिश्मा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद आमगाव अंतर्गत मौजा -माल्ही येथील अनाधिकृत रित्या नळाला टुल्लू पंप लावणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करुन त्यांचे टुल्लू पंप नगर परिषद द्वारे जप्त करण्यात आले.
उपरोक्त कार्यवाही मध्ये समाविष्ट श्रीकिसन ऊके, राजेन्द्र शिवणकर, राजेश पांडे, मुकेशकुमार वाकले, ओमप्रकाश काटेखाये,राजेन्द्रप्रसाद शेेंदरे,माधोराव मुनेश्वर,राजेश डोंगरे, रतिराम डेकाटे,ओमप्रकाश राहांगडाले,संजय चुटे,मुन्ना राहांगडाले इत्यादी (पाणीपुरवठा पथक) कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.