अहेरी::– दिनांक 16 जून 2024 रोजी अमरावती येथे शिक्षण सन्मान सन्मान अभियानांतर्गत राष्ट्र निर्माता शिक्षक सन्मान सोहळा 2024 पार पडला यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी, केंद्र अहेरी पंचायत समिती अहेरी जिल्हा गडचिरोली यांना *राष्ट्र निर्माता शिक्षक सन्मान 2024* हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्री संजय कोंकमुट्टीवार यांनी आपल्या तीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेत आजपर्यंत अनेक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सेवा देऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांची विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली तळमळ व प्रयत्न विद्यार्थी दत्तक पालकत्वासाठी पुढाकार तसेच गुणवत्तापूर्ण उपक्रम या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली याप्रसंगी त्यांचा अमरावती येथील अभियंता भवन येथे संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक गोविंद कासट यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय ढाकूलकर,संस्थापक अध्यक्ष शिक्षण सन्मान अभियान, संतोष बोरकर राज्य उपाध्यक्ष, श्री बापू भोयर राज्य कार्याध्यक्ष, श्री कांबळे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अहेरी, त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख उमेश चिलवेलवार केंद्र अहेरी तसेच सर्व समस्त मित्रपरिवार यांनी संजय कोंकमुट्टीवार सर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

