गोंदिया, दि.20 :महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यालयाच्या मार्गदर्शनानुसार गोंदिया जिल्ह्याचा वर्ष २०२४-२५ चा क्रेडीट प्लॅन सेमिनार १८ जून २०२४ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विभागीय सल्लागार माविम नागपूर विभाग राजु इंगळे ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते, तर प्रत्यक्षरित्या नाबार्डचे सहायक महाप्रबंधक अविनाश लाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र मडावी, दिलीप पारधी व कैलाश मेश्राम ICCI बँक, जिल्हा व्यवस्थापक BOM श्री. चौधरी, जिल्हा व्यवस्थापक BOB श्री पटले, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यासह जिल्ह्यातील स्टाफ, CMRC व्यवस्थापक, सहयोगिनीच्या उपस्थितीत क्रेडीट प्लॅन सादरीकरण करण्यात आले.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाने राज्यस्तरावर केलेली प्रगती व त्यामध्ये बँक सहभाग याबाबत राजु इंगळे यांनी मांडणी केली. जिल्ह्याचा क्रेडीट प्लॅन साध्य व सन २०२४-२५ च्या प्लॅन बाबत वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मांडणी केली. त्याबाबत विविध बँकांनी आपली प्रतिक्रिया देत काही सुचना दिल्या. अविनाश लाड DDM नाबार्ड यांनी यथोचित मार्गदर्शन केले व या क्रेडिट प्लॅनला सर्व उपस्थितांनी मान्यता देवून अधिकाधिक ME लोन साध्य करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक लिंकेज करणाऱ्या CMRC स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव ८.५१ कोटी, नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरी ५.९२ कोटी (नव तेजस्विनी योजना), सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा ७.०३ कोटी, स्त्री शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र करटी/बु. 6.92 कोटी (MSRLM योजना). वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक लिंकेज करणाऱ्या सहयोगिनीशोभा तावाडे- स्वावलंबन CMRC आमगाव ६४ गट २.७० कोटी, कल्पना नंदेश्वर- आधार CMRC सडक अर्जुनी ५४ गट २.३८ कोटी (नव तेजस्विनी योजना), छाया मोटघरे- सहारा CMRC सालेकसा ११० गट ४.४४ कोटी, नंदेश्वरी बिसेन- तेजप्रवाह CMRC सुकडी १२१ गट ४.२६ कोटी (MSRLM योजना). वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ME कर्ज करणारी CMRC सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा- ११२ महिला १.०१ कोटी. वर्ष २०२३-२४ मध्ये ११ लक्ष रुपयाच्या वर कर्ज करणारी CMRC प्रयास लोकसंचालीत साधन केंद्र परसवाडा ४ गट.वर्ष २०२३-२४ मध्ये विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार उत्कर्ष CMRC गोंदियायांनी नव तेजस्विनी, NULM, Minority या तिन्ही योजना मिळून ५२४ गट व 19.१६ कोटी कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. तसेच वर्ष 20२३-२४ मध्ये जिल्ह्याचे १२१.८३ कोटी चे साध्य मध्ये बँकांचे उत्तम सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आले.
तसेच वर्ष 20२४-२५ करिता २६६७ गट १०४.१८ कोटी, ३९२ JLG ११.७६ कोटी व ५६९ ME कर्ज ८.३२९ कोटी चा लक्षांक सर्व बँक मिळून सादर करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी दिली.