गोंदिया, दि.20 :केंद्र व राज्य शासनाच्या प्रचलित दिशानिर्देशांच्या आधारित क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2024 रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील योग संघटना, योगपटू व जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.