वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :- 21 जून 2024
देवळी येथील जल क्रीडा प्रेमी जलतरण मंडळ देवळी यांनी जागतिक योग दिवस विहिरीमध्ये साजरा केला. विहरी मध्ये विविध प्रकारचे आसन, पाण्यावर तरगणे, बराच वेळ श्वास घेऊन पाण्यात राहणे, लांब उडी घेणे अशा बऱ्याच प्रकारचे व्यायाम केले, जलतरण मंडळ संपूर्ण वर्ष या व्यायामाचा सराव करतात.यावेळी राजेशभाऊ बकाने, डॉक्टर नरेंद्र मदनकर. नानाभाऊ तलमले, सुरेशभाऊ तायवाडे, विजय भाऊ पेटकर, प्रकाश भाऊ चांभारे, वसंता भाऊ तरास, गजानन पोटदुखे, छत्रपती जी वानखेडे,श्याम पोटदुखे, विजय पिंपळकर, प्रकाश भोयर, डॉ. विनय भोयर, यश पोटदुखे, पवन पोटदुखे, धीरज पोटदुखे, त्रिशूल येनुरकर, आयुष राऊत, चैतन्य पोटदुखे, सुधाकर भाऊ भोयर, वैभव झाडें,वैभव धोटे इत्यादी मंडळी उपस्थित होते.