गौरीशंकर गौतम यांची ए.एस.आय.पदी पदोन्नती

0
50
1

भंडारा /अतुल पटले 

पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय तुमसर येथील पो. हवा. गौरीशंकर गौतम यांनी पोलीस विभागात प्रामाणिकपणे ३२ वर्षे सेवा दिली. त्याकरिता पोलीस विभागाच्या वतीने त्यांना ए. एस. आय. पदी पदोन्नती देण्यात आली आहे.आयपीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी रस्मिता राव तुमसर यांचे हस्ते ए. एस. आय. गौरीशंकर गौतम यांना एक स्टार लावून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रमात वाचक फौजदार विजय पंचबुद्धे पो. हवा. कल्पना बीसेन, चालक पो. हवा. पिपरेवार, पो. शि. रवी आडे, पो. शि. देवा हलमारे,पो. शि. विकास डाकरे, कौस्तुभ गौतम, सुरभी गौतम हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सांगता सहा. फौजदार गौरीशंकर गौतम यांना पेढा भरवून करण्यात आली.