गोरेगावात 23 जून रोजी ‘मिडिया नवरत्न अवार्डʼ

0
11
1

◼️गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ, गोरेगावचे आयोजन

◼️पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम राहणार उपस्थित

गोरेगाव प्रतिनिधी

गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ गोरेगावच्या वतीने दिनांक २३ जून रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता स्थानिक बी व्ही लॉन येथे ‘मिडिया नवरत्न अवार्डʼ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले राहणार आहेत तर दीप प्रज्वलन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पं. स. सभापती मनोज बोपचे, गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव वीरेंद्र जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात समाजातील विविध घटकातील नऊ रत्नांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दरम्यान, गोरेगावचे उद्योजक लक्ष्मीकांत बारेवार यांना उद्योग रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असतानाच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक रूपचंद येडे यांना लोकसेवक रत्न तर दिनेश कुमार अंबादे यांना साहित्यरत्न, डॉ. रुस्तम येडे यांना आरोग्य रत्न, पंकज रामलाल पटले यांना कृषिरत्न, वरिष्ठ पत्रकार संतोष नागनाथे यांना पत्रकार रत्न, सामजिक कार्यकर्ता सुरेश रहागडाले यांना समाज रत्न पुरस्कार तर जिल्हा परिषद शाळा जानाटोला घोटी या शाळेला शिक्षण रत्न व मलपुरी या महसूली गावाला गुन्हेगारी मुक्तगाव रत्न या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ गोरेगाव संघाचे अध्यक्ष भरत घासले, कार्याध्यक्ष प्रमोद नागनाथे, सचिव दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष देवेंद्र रहांगडले, कोषाध्यक्ष डिलेश्वर पंधराम, वामनराव गोळगे, दिलीप मेश्राम आदी पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.