समाजाच्या संघटीत व एकतेमुळे विजय – खा.डॉ.नामदेव किरसान

0
36
1

सालेकसा / बाजीराव तरोने

आदिवासी व बहुजन समाजाच्या एकतेमुळे व संघटित पणामुळे लोकसभा निवडणुकीत गडचिरोली -चिमूर क्षेत्रातून आपला विजय सोपा झाला असे उद्गार नवनिर्वाचित खा.डॉ.नामदेव किरसान यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
श्रीअर्धनारेश्वरालय शिवगणमंगल भवन हलबीटोला/सालेकसा येथे आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना कटंगी(बुज.)व कर्मचारी संघटनेद्वारा गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले खा.डॉ.नामदेव किरसान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि.१७रोज सोमवारला आयोजित करण्यात आला होता.या विजयामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.आदिवासी समाजाच्या समस्या मी लोकसभेत मांडून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असेही सत्कारमूर्ती खा.डॉ नामदेव किरसान यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव गावड,उद्घाटक आर.एस.नायक छत्तीसगड ,दीपप्रज्वलक आ.सहेषराम कोरोटे, मुख्य अतिथी ओ.एस.जमदाळ छत्तीसगड,फरेंद्र कुथिरकर,आर.एम.कोजबे, यशवंत मलये,आर.एल.पुराम,हेमराज राऊत अमरावती, दुर्गाप्रसाद कोकोडे ,वाय.सी.भोयर,रमन सलाम,सौ.आरती चवारे, सौ.नलिनी किरसान,हिरालाल भोई, राधेश्याम टेकाम, प्रा.जनार्दन कोल्हारे,प्रा.मधुकर दिहारी, सावंतबापू राऊत,राहुल येल्ले, मुलचंद गावराने,जे.डी.गावडकर,बालाराम वालापूरे,सरादू चिराम,जे.ए.घासले ,व्यंकटराव जी चनाप, डॉ पांडुरंग मारगाये, चेतन वडगाये,बी.यु.घासले,डि.जी.कोल्हारे, पुरषोत्तम कटरे,ॲड.दुष्यंत किरसान यांसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते, अध्यक्ष, उद्घाटक व अतिथिंनी यथोचित मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी इयत्ता दहावी, बारावी व स्पर्धात्मक परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोयर, संगिता घासले तर प्रास्ताविक अजय कोठेवार, आभार वाय.सी.भोयर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश प्रधान,निकेश गावड, ओमप्रकाश घरत,शिवानंद फरदे, देवानंद खांडवाये,मोहन राऊत,नेवालाल हरदुले, मधुकर कुरसुंगे,वासुदेव घरत,जे.डी.हरदुले,खेमराज भंडारी,झामसिंग भोयर,डी.डी.धनभाते,जी.एस.खांडवाये, प्रमोद राऊत, सुभाष प्रधान,देवचंद चौधरी, हेमराज किरसान,निलाराम नाईक, अशोक हरदुले,शंकर काठेवार, भाऊराव येल्ले, कपिल किरसान, डेव्हिड राऊत, आनंद चर्जे, मेघराज घरत यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड मधील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.