बोरकन्हार येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

0
14
1

आमगांव : तालुक्यातील ग्राम पंचायत बोरकन्हार येथील मनरेगा योजने अंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरु असताना मजुरांच्या उपस्थितीत दि.२१ जून २०२४  शुक्रवार रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच रविंद्र घरत,उपसरपंच अँड लखनसिंह कटरे, ग्राम पंचायत सदस्य झुमकलाल बोपचे, सौ.मंगलाताई कापसे, सौ. अर्पिताताई पारधी ग्रामसेवक अविनाश रहांगडाले, ग्रा.रो. सेवक उल्हास तुरकर, परिचर रामलाल बागडे, सामाजिक कार्यकर्ते  सुरेश मटाले, राजकुमार कापसे, अंगणवाडी सेविका सौ. भुमेश्र्वरी बोपचे, सौ. हर्षाताई पुंड तसेच समस्त गावातील मजुर बंधू आणि भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग  करून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात आले.