

आमगाव– भवभुती शिक्षण संस्था आमगाव द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे आज (ता.२१) जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणूनआमगावचे योगशिक्षक श्री के. टी. बिसेन, छत्रपती शिवाजी फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. चंद्रशेखर बळवाईक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुलसीदास निंबेकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम 2024 च्या संकल्पनेनुसार ‘योगा फोर सेल्फ अँड सोसायटी” ह्या विषयानुसार महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आला. मानवी जीवनात योगाचे महत्व व काही योगासने बिसेन सर यांनी उपस्थित विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना समजून सांगितले.
महाविद्यालयाचे संचालक केशवराव मानकर व डॉ. डी.के. संघी यांनी सदर आयोजनाबद्दल कौतुक व्यक्त केले.


