आदर्श विद्यालयाच्या प्राँगणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

0
18
1

आमगाव :  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, पतंजली योग समिती,आरोग्य भारती, रेल्वे स्काऊट गाईड, सुप्रभात मित्र मंडळ आमगाव यांच्या सहकार्याने आदर्श विद्यालय आमगाव येथे (ता.२१)सकाळी ६.३० ते ८ या वेळात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. याप्रसंगी विनायक अंजनकर यांनी योग दिनाबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. दिनेश शेंडे परमेश्वर बोपचे व दिनाजी चुटे यांनी याप्रसंगी आसन प्राणायाम इत्यादीचे प्रात्यक्षिक करून दाखवले व उपस्थिती योग प्रेमींनी त्यांच्या मार्गदर्शनात आसन आणि प्राणायाम केले. कार्यक्रमाच्या शेवटी संकल्प घेण्यात आला व शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
योग दिनाच्या यशस्वीतेसाठी योग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोसरकर, रमेश कावळे, भारत स्वाभिमानचे तालुका प्रभारी राजेंद्र चुटे, हेमंत पटले, आरोग्य भारतीचे डॉक्टर श्रीकांत राणा, आमगाव स्काऊट गाईडचे ग्रुप लीडर विनोद कुमार उंदीरवाडे, सेक्शन इंजिनिअर अनंत गुप्ता, जगदीश सावरकर, सुप्रभात मित्र मंडळ चे दिनेश चिंचाळकर, राकेश शेंडे, भैय्यालाल मानकर, सतीश साखरकर,ललित पटले,अशोक गुप्ता,ललिता मानकर इत्यादींनी सहकार्य केले. याप्रसंगी नगरातील योग प्रेमी बंधू भगिनी उपस्थित होते.