वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-21 जून 2024
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यंदा १० वा योग दिन साजरा होत आहे. व या वर्षी योग दिनाची थीम ‘योग फॉर सेल्फ अँड सोसायटी’ अर्थात स्वत:साठी आणि समाजासाठी योग आहे. योगासने केल्याने लवचिकता, सामर्थ्य आणि संतुलन सुधारते आणि यामुळे मन आणि मेंदूला भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या फायदा होतो.
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ चे औचित्य साधत सृजन शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष योग दिनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी सकाळी योग दिन साजरा केला. शाळेत सकाळी ७ वाजल्यापासून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कार, कपालभाती, ताडासन, अनुलोम-विलोम, शिर्षासन, मयुरासन आदि प्रकाराचे योगासने केली. क्रीडा शिक्षक सुरज डाखरे यांनी योगाचे धडे दिले. योग हा 21 जून या योग दिनापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग असला पाहिजे असा संदेश देत अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योगा दिन साजरा केला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा चोरे , प्राथमिक मुख्याध्यापिका प्रिया वैद्य व उच्च माध्यमिक प्राचार्या सीमा वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.