सहशालेय उपक्रमातून विद्यार्थी गुणवत्ता विकास

0
289

जि. प.उच्च प्राथ.शाळा सिदूर

आमची शाळा आमचे उपक्रम

भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भाच्या कुशीत ब्लॅक गोल्ड चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यात एक गाव तेच आमचे गाव सिदूर गावाच्या पूर्व दिशेला आमची शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर छोटीशी शाळा माध्यम मराठी विद्यार्थी 72 आणि शिक्षक 3 आणि वर्ग 1 ते 8.त्यातच अनेक शैक्षणिक उपक्रम व दैनंदिन शालेय कामकाज त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून आले पाहिजे तेवढा वेळ विद्यार्थ्यांना देता येत नाही याची खंत आम्हा सर्व शिक्षक वर्गाला वाटू लागली आणि त्यामुळेच आम्हाला सहशालेय उपक्रमाची गरज भासली आणि शिक्षणासोबतच इतर सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत सहज आणि सोप्या उपक्रमातून वाढ कशी करता येईल यासाठी एक एक उपक्रम सुचत गेले आणि त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या भावात्मक, बोधात्मक, क्रियात्मक क्षमतेत वाढ करता आली.
“फळा फुलांचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे.
एक दिवस गावात देऊळ नसेल तर चालेल पण अशी आमची उपक्रमशील शाळा पाहिजे”
या उपक्रमाच्या सहवासात शिक्षक कमतरता जाणवलीच नाही आणि आमचे शिक्षणही चालू झाले.याचाच परिणाम आमची वर्ग एक ते आठ चे विद्यार्थी बोलकी अभ्यासू आणि स्वयंअध्ययन करून आपली स्तर निश्चिती करण्यापर्यंतची मजल गाठलेली आहेत उपक्रमशील शिक्षकांमुळे शाळा विकास चांगल्या पद्धतीने घडून आला आहे अशी प्रतिक्रिया गावातून अधिकारी यांचे भेटीदरम्यान प्रतिक्रियेतून ऐकायला मिळते.
शैक्षणिक क्षेत्राच्या सुरुवातीलाच एक शिक्षक सेवानिवृत्त,दुसरे प्रतिनियुक्तीवर त्यामुळे गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समिती व पालक अतिशय नाराज झाले. शिक्षक 3 वर्ग 8 कसे शिकणार विद्यार्थी ? प्रत्येक जण विचारू लागला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला अनेक उपक्रमाची गरज वाटली विषयावर उपक्रमाची मांडणी केली आणि प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.
गुणवत्ता विकास हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आज आमची शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.
शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात शाळेच्या सुरुवात इंग्रजी परिपाठाने होते कारण शिक्षक कमी त्यामुळे इंग्रजी विषयाकडे पाहिजे तेवढे लक्ष देता येत नव्हते वर्ग दोन ते आठ ची सर्व विद्यार्थी इंग्रजीतून परिपाठ सादर करतात काही अडचणी आल्या जसे शब्द चार पण सरावाने सोपे झाले चला बोलूया इंग्रजी या उपक्रमासाठी इयत्ता 1ते 5 मधील सर्व विद्यार्थ्यांना अविनाश जुमडे सरांनी मी इंग्रजी वाचणारच हे पुस्तक देऊन इंग्रजी विषयाची तयारी करून घेतली आज रोज छोटे छोटे वाक्य विद्यार्थी इंग्रजीत बोलतात विद्यार्थी उत्तम असा परिपाठ इंग्रजीतून सादर करतात त्यातून इंग्रजी शब्द संपत्तीत खूप वाढ झाली आहे.
ज्ञानपुष्प
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ज्ञानपुष्प हा उपक्रम घेतला जातो त्यात सर्व विषयावर पाच प्रश्न विचारले जातात विद्यार्थी त्याची उत्तरे देतात याची नोंद रोज वहीमध्ये घेतली जाते ताज्या घडामोडी विसरली जाणारी प्रश्न असल्यामुळे रोजच नवीन माहिती विद्यार्थ्यांना मिळत असते व विद्यार्थी अपडेट असतो हे विशेष यातूनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची आवड निर्माण होऊन गावातून अनेक अधिकारी घडावे हा मुख्य हेतू.
विज्ञान कोडे
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि हा विषय अगदी जवळचा वाटावा यासाठी दररोज विज्ञान कोडे परिपाठाच्या वेळेस विचारले जाते विज्ञान कोड्याचे उत्तर जो विद्यार्थी देतो त्याला एका शास्त्रज्ञाचे नाव दिले जाते आणि त्या शास्त्रज्ञाच्या नावाने त्याला दिवसभर आवाज दिला जातो त्याचे मूळ नाव घेऊन त्याला आवाज दिला जात नाही त्या दिवशी त्याच्या घरचे सुद्धा त्याला त्या शास्त्रज्ञाच्या नावानेच आवाज देतात हे विशेष.अवघड वाटणारी कोडी विद्यार्थ्यांना अधिक सोपी वाटायला लागली आहे सांगायचं झालं तर सन 2022 -23 मध्ये इन्स्पायर अवार्ड ,विज्ञान प्रदर्शन या मानाच्या समजल्या जाणाऱ्या दोन्ही इव्हेंटमध्ये राज्यस्तरावर शाळेने नेतृत्व केलेले आहे.
सेंद्रिय परसबाग
विद्यार्थ्यांचा उत्साह वाखण्य जोगा आहे विद्यार्थी स्वतः या सेंद्रिय बागेमध्ये करणे रोप लावणे झाडांना नेहमीच पाणी देणे ही सगळी कामे विद्यार्थी आवडीने करतात विद्यार्थ्यांना रोजच्या शालेय पोषण आहारामध्ये या परसबागेतील पालक मेथी कोथिंबीर वांगी लसुन फुलकोबी शेंगा याचा वापर केला जातो यातूनच प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.
गांडूळ खत
सेंद्रिय परसबाग सोबतच शाळेतील आमचा ऑक्सिजन पार्क या दोन्हीसाठी उपयुक्त असा उपक्रम म्हणजे आमचा गांडूळ खत. यासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या मेहनत व परिश्रमाने गांडूळ खत निर्मिती हा उपक्रम पूर्णत्वास आलेला आहे.10×4 चा खड्डा तयार करून पालापाचोळा ,जुने खत, कुटार ,वाळलेले गवत,शेणखत हे त्या खड्ड्यात टाकून त्यात अमेरिकन गांडूळ सोडून खत निर्मिती सुरू आहे. ही प्रक्रिया किचकट व वेळ खाऊ असली तरी याचा परिणाम मात्र उत्तम खत निर्मिती होऊन सेंद्रिय परसबाग ऑक्सिजन पार्क यासाठी होत असल्यामुळे सर्वांनाच आनंद वाटला यासाठी गावकरी समाज शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्य लाभले.
ऑक्सिजन पार्क
कोरोना सारख्या महामारी जाणीव झाली ती ऑक्सिजनच्या कमतरतेची आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व जाणून देऊन शिदूर येथे ऑक्सिजन पार्क तयार करण्याचे आम्ही शिक्षकांनी ठरवले आणि त्यासाठी दोनशे विविध झाडे त्यामध्ये तुळस कडूलिंब अनिल गिरी पिंपळ याची रोपे गावकरी पालक विद्यार्थी याची मदतीने लावले खड्डा करणे, झाडे लावणे, पाणी देणे, त्याचे संवर्धन करणे यासाठी विद्यार्थी गावकरी खूप परिश्रम घेतात विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन दोन झाडे दत्तक दिलेली आहे त्यामुळे त्याची काळजी चांगल्या पद्धतीने होत आहे त्यातूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कडून चुकले आहे व त्याच्या ज्ञानात वाढ झालेली आहे.
सुंदर हस्ताक्षर
विद्यार्थ्यांचा आरसा म्हणजे त्याची सुंदर हस्ताक्षर आणि त्यासाठी राबविला जातो अक्षर सुधार उपक्रम यासाठी विद्यार्थी रोज पाच ओळी शुद्धलेखन लिहून आणतात. आपली अक्षरे कशी अधिक सुंदर करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष देतात व आनंद व्यक्त करतात हस्तलिखित लिहून आणतात अनेक हस्तलिखित नमुने शाळा स्तरावर जमा आहेत विद्यार्थ्यांना दररोज शुद्धलेखन दिले जाते तसेच सुविचार मनाचे श्लोक मनी यासारखे लेखन विद्यार्थी स्वतःच्या हस्ताक्षरात तयार करून शाळेतील प्रार्थना या ठिकाणी दर्शनी भागात लावले जातात.
गव्हांकुर
आमच्या गावामध्ये विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी व सोबतच अनेक विद्यार्थ्यांमध्ये पोटदुखीच्या आजाराचे प्रमाण जरा जास्तच आहे त्यामुळे विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत कुठेतरी कमी वाढतो त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गव्हांकुर नावाचा उपक्रम शाळा स्तरावर घेतला जातो दर शनिवारला अर्धा कप गव्हांकुरचा रस अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना दिला जातो यामुळे विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढवून विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रियेत सुधारणा होऊन बदल दिसत आहे.
समान हेअर कटिंग
शाळेतील विद्यार्थ्यांना एक शिस्त असावे विदर्भामध्ये समानता दिसावी यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे हेअर कटिंग एकसारखीच करण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी सदैव उत्साही असून शाळेचे एक वेगळे रूप पाहायला मिळते.
आमचे दुकान
विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान अधिक बळकट होण्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवत आहोत हा उपक्रम आमचे दुकान.
गणित विषय अंतर्गत व्यवहार ज्ञानासाठी व उपयोजनासाठी विद्यार्थीच हा उपक्रम चालवतात यामध्ये पेन पेन्सिल रंग कांड्या खोडरवर छोटी वहिनी बुक या वस्तू आणि प्रत्यक्ष व्यवहारातून पैशाचा व्यवहार बेरीज वजाबाकी क्रिया नफा तोटा या संकल्पना स्पष्ट होतात व विद्यार्थी गणित शिकण्याचा आनंद घेतात अशा अनेक उपक्रमामुळे शाळेचा दर्जा उंचावला आहे मुला मुलींना स्वच्छ व नीटनेटके राहण्याची सवय लागावी यासाठी शाळेत आजचा गुलाब हा उपक्रम सुद्धा घेतला जातो तसेच प्लास्टिक मुक्त परिसर हा सुद्धा शाळेचा उपक्रम त्यामुळे शालेय परिसरात कुठेच प्लास्टिक पडलेले दिसत नाही त्यामुळे शाळा स्वच्छ सुंदर दिसते तसेच तंबाखूमुक्त शाळा असल्यामुळे शाळेत हा उपक्रम सुरू आहे.
शाळेतील उपक्रम देईल भविष्याला वळण उपक्रम छान त्यातून मिळते ज्ञान सहशाले उपक्रम फक्त राबविणे असे उद्दिष्ट न ठेवता प्रत्येक क्षणी त्या जबाबदारी स्वीकारून त्याची फलनिष्पत्ती काय मिळेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारली व इतर सहशालेय उपक्रम सोबतच जीव ओतून शिक्षकांनी अध्यापन केले यात शालेय मंत्रिमंडळ मीना राजीव म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी सहकार्य करिता तयार असलेली तरुण मुले माजी अध्यक्ष सदस्य यांच्या सहकार्याने उपक्रमाची सुरुवात केली कुठेही खंड पडू न देता मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्याचे प्रयत्न केले. जेवढ्या ताकतीने उपक्रम सुरू केले तेवढ्याच जिद्दीने विद्यार्थ्यांनी सहकार्य केले त्यांच्या जिद्दीनेच वसह सर्वांच्या सहकार्याने विशेष बदल आमच्या शाळेत दिसत आहे मागील सतरापेक्षा या सत्रात विद्यार्थी हा आत्मविश्वासकपूर्ण दिसत आहे त्यांच्याच प्रयत्नाने प्रभावी बदल दिसत आहे व शालेय वातावरण दर्जेदार शिक्षणाच्या वाटचालीवर आहे विशेष म्हणजे वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न यामुळे हा बदल दिसत आहे.
आमची शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिद्धू येथे सहशालेय उपक्रम यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हा उपक्रम विद्यार्थ्यांना व पालकांना खूपच आवडला या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी अतिशय आनंदाने सहभागी झाले आणि विद्यार्थी विद्यार्थी ही आंतरक्रिया सुरू होऊन आंतर शिक्षण सुरू झाले ही आवडते मजळगाव मनापासून शाळा लाईव्ह ती लढा जशी माझी उपक्रमशील शाळा असे विद्यार्थी म्हणू लागलेत या उपक्रमामुळे शंभर टक्के उपस्थिती राहण्यास मदत झाली शिस्तीने राष्ट्र घडते आणि उपक्रमाने शाळा घडते याची उदाहरण म्हणजे आमची शाळा सहशालेय उपक्रम हे आमचे चौथी शिक्षक सर्वच उपक्रम गुणवत्तेवर आहे असे नाही काही उपक्रम खेळाबाबत तर काही अभ्यासाबाबत असतात छोटासा शब्द वहीत लिहायचा पाठ करायचा अर्थ लिहायचा आणि शब्दाचा डोंगर बनवायचा आणि डोंगर बनवताना मित्र मैत्रिणीची मदत घ्यायची आणि त्यातून मनोरंजन होते इंग्रजी परिपाठामुळे इंग्रजीमध्ये बोलणारी संधी प्रत्येकाला मिळते थोडीफार इंग्रजीत माहिती सुद्धा मिळते असे शाळेतील अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांना कितीतरी गुण शिकायला मिळाले.
शाळेतील उपक्रम देईल भविष्याला वळण उपक्रम छान यातून आम्हास मिळते ज्ञान या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर छाप पडली त्यांच्या कलागुणांना वाव तर मिळालाच पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल पण झाला शिक्षकच शिकवायला आवश्यक आहे असे आता विद्यार्थ्यांना वाटत नाही आम्हीच आमचे शिक्षक आमचे शिक्षक आम्हीच निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला आहे हुशार विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी स्वतः नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत आहे सामूहिक आणि वैयक्तिक असल्याचा व्यक्तीच्या सहभाग असतो सांगायचे तर शिक्षक कमी आता शिकवायचे कसे हा मोठा प्रश्न आता दूर झाला आहे उपक्रम हे आमचे बंधू बनून आम्हाला सहकार्य करायला आले आहेत पालकांना गावकरी याचंच होते शिक्षण कसे चालणार पण आता त्यांना उपक्रमातून शाळेतील परिवर्तन दिसत आहे त्यावर ते सुद्धा आनंदी आहेत पालकांचा सक्रिय सहभाग ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. शालेय गुणवत्ता वाढ हे ध्येय पूर्ण करण्यात पालक गावकरी स्वयंसेवक यांचे सुद्धा मोलाची सहकारी लाभले आहे आणि त्यामुळेच हा सकारात्मक बदल दिसत आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आपल्या शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांचे सर्वांनी विकास करीत असताना त्याच्या भावात्मक दुधात्मक क्रियात्मक सांस्कृतिक वैचारिक नैतिक विकास होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांना पैलू पाडण्यासाठी अशा अनेक उपक्रमाची वाघ मोकळी करणे गरजेचे आहे या उपक्रमात पालक शिक्षणप्रेमी बालमित्र ग्रुप यांची खूप मदत झाली या उपक्रमामुळे वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत झाली श्रवण भाषण वाचन लेखन ही कौशल्य नकळत सहजपणे आत्मसात केली अनेक तंत्रज्ञानाचा वापर शाळेत जसे प्रोजेक्टर टीव्ही संगणक मोबाईल याद्वारे आत्मविश्वास निर्माण झाला संस्कृतींचा योग्य वापर करून ज्ञानार्जनात भर पडली शिक्षण प्रक्रिया आनंदाची झाली या उपक्रमासाठी मदत करणारे प्रोत्साहन करणारे सर्व शासकीय अधिकारी पालक वर्ग गावकरी स्वयंसेवक विद्यार्थी यांचे खूप खूप आभार.
-अविनाश जुमडे (सहा. शिक्षक)
जि. प. उच्च प्राथ. शाळा सिदूर
पं.स. चंद्रपूर, जि. चंद्रपूर
Previous articleस्टेट बँकेकडून सीएसआर निधीतून मेडिकल कॉलेजला व्हील चेअर प्राप्त
Next articleकु.प्रतिक्षा ऊके चे एम. एच.नर्सिंग सीईटी मध्ये सुयश